Mohsin Naqvi absence from Asian Games cricket final
esakal
Mohsin Naqvi not be in attend India vs Pakistan Final: भारत-पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील क्रिकेटचा अंतिम सामना रंगणार आहे. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा आणि पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून सुवर्णपदकाच्या लढतीत धडक मारली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक कायम राखण्यासाठी उतरणार आहे. आता IND vs PAK सामना म्हटला की एक नाव हमखास समोर येणार आणि ते म्हणजे मोहसिन नक्वी... पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे ( ACC) अध्यक्ष नक्वी यांना पुन्हा अपमान होणार हे डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला.