India vs Pakistan Asia Cup match gets government approval : आशिया चषक २०२५ स्पर्धेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भारत सरकारने आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) मान्यता दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातते वातावरण तापले होते आणि दोन्ही देशांकडून युद्धही पुकारले गेले होते. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, असा सूर होता. पण, आता भारत सरकारनेच IND vs PAK लढतीला कोणताच विरोध नसल्याचे स्पष्ट केले.