

IND vs PAK head-to-head stats in UAE for Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आता काही तासांवर आला आहे. कट्टर प्रतिस्पर्धी २३ फेब्रुवारीला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांचा सुरुवातीच्या सामन्यात परस्परविरुद्ध अनुभव राहिला आहे. भारताने बांगलादेशवर सहा गडी राखून सहज विजय मिळवला, तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.