IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

India vs Pakistan Asian Legends League 2026 live streaming: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटला की चाहत्यांमध्ये वेगळीच उत्सुकता निर्माण होते. आता पुन्हा एकदा हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एशियन लीजेंड्स लीग २०२६ मध्ये आमनेसामने येणार आहेत. २ ऑगस्ट रोजी झाम्बियातील लुसाका येथील लोटस स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर हा महामुकाबला रंगणार आहे.
India vs Pakistan

India vs Pakistan

Updated on

Where to watch India vs Pakistan Legends live? आगामी आशियाई स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना होणे, जवळपास अवघड झाले आहे. पण, त्याआधी तुम्हाला हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर आलेले दिसणार आहे. झांबियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एशियन लीजेंड्स लीग २०२६ मध्ये हा सामना होणार आहे. या लीगमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे निवृत्त खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये एशियन स्टार्स नावाचा एक संघही आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com