INDIA VS PAKISTAN ON JUNE 14 AS ICC WOMEN’S T20 WORLD CUP 2026 FULL SCHEDULE ANNOUNCED
esakal
Full fixtures for ICC Women’s T20 World Cup 2026 unveiled : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) १२ संघांचा समावेश असलेल्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर केले. यजमान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्या लढतीने १२ जूनला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे १० वे पर्व १२ जून ते ५ जुलै या कालावधीत १२ संघांच्या समावेशात पार पडणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करणारे बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड व नेदरलँड्स हे अंतिम चार संघ ठरले आहे.