IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध स्मृती मानधनाची नजर 'या' रेकॉर्डवर; आशिया कपमध्ये पुन्हा इतिहास रचणार?

SMRITI MANDHANA EYES ANOTHER WORLD RECORD AGAINST PAKISTAN: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाला महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होण्याची संधी आहे. सुजी बेट्सच्या ४,७५८ धावांचा विक्रम मोडण्यासाठी स्मृतीला आणखी ७८ धावांची गरज आहे.
IND vs PAK

IND vs PAK

esakal

Updated on

SMRITI MANDHANA EYES ANOTHER WORLD RECORD AGAINST PAKISTAN: भारत महिला आशिया कप २०२६च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल. या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा भारतीय सलामीवीर स्मृती मानधना(Smriti Mandhana) हिच्यावर असतील.

स्मृतीने हॉन्गकॉन्गविरुद्ध १२४ धावांची शानदार खेळी केली होती. या खेळीदरम्यान तिने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तसेच १८ शतकांसह महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com