

IND vs PAK
esakal
दुबई : महिला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झालेला असताना आज भारत-पाकिस्तान लढतीची रंगत पार पडणार आहे. भारतीयांचे पारडे चांगलेच जड असल्यामुळे ही लढत जिंकणे कठीण जाणार नाही.
पुरुष असो वा महिला बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता ताणलेली असतेच. त्याचप्रमाणे उद्याच्या सामन्याचीही चर्चा सुरू झालेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असलेला भारतीय संघ उद्याच्या या लढतीतही बाजी मारण्याची शक्यता अधिक आहे.