BCCI vs Mohsin Naqvi Asia Cup trophy controversy
esakal
Asia Cup 2026 trophy presentation if India wins: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया चषक जिंकला, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याहस्ते विजयी ट्रॉफी घेण्यास नकार दिला अन् वातावरण पेटले. आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख नक्वी यांनी अजूनही आशिया चषक भारताला दिलेला नाही. त्यात आता पुन्हा एकदा हा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत, कारण या महिन्याच्या अखेरीस महिलांची आशिया चषक स्पर्धा होणार आहे. दुबईत होणाऱ्या या स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगालदेश यांच्यासह अन्य संघ सहभाग घेणार आहेत. १३ सप्टेंबरला या स्पर्धेची फायनल होईल आणि तेव्हा पुन्हा एकदा BCCI vs Mohsin Naqvi असा सामना पाहायला मिळू शकतो.