India vs South Africa Sakal
Cricket
SA vs IND: मार्करमने जिंकला टॉस! T20I वर्ल्ड कप फायनलनंतर पुन्हा एकदा भारत-दक्षिण आफ्रिका आमने-सामने
India vs South Africa 1st T20I Match: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील टी२० मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकली.
India vs South Africa 1st T20I Playing XI: भारताचा टी२० संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेला शुक्रवारपासून (८ नोव्हेंबर) सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बनच्या किंग्समेड मैदानात होत आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ टी२० मध्ये जूनमध्ये झालेल्या टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत.