

India VS South Africa T20
sakal
मुल्लानपूर (न्यू चंडीगड) : कटकमधील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आज होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यास अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाईल, पण त्याचा फायदा कर्णधार आणि उपकर्णधार अनुक्रमे सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल कसा घेतात, हे येणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.