IND vs SL: भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या LIVE ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती

India vs Sri Lanka 2nd Test 2026: भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना २३ ऑगस्टपासून कोलंबोमध्ये होणार आहे. सामन्याची वेळ, Sony Sports Network वरील LIVE ब्रॉडकास्टिंग, SonyLIV वरील लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सामना कुठे पाहता येणार, याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
IND vs SL

IND vs SL

esakal

Updated on

India vs Sri Lanka 2nd Test 2026: भारत आणि श्रीलंका(IND vs SL) यांच्यातील दुसरा कसोटी सामना २३ ते २७ ऑगस्ट २०२६ दरम्यान कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीनंतर मालिकेतील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हा सामना नेमका कुठे पाहता येणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा १६५ धावांनी धुव्वा उडवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका आपल्या खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

IND vs SL
IND vs SL 1st Test : भारत-श्रीलंका पहिली कसोटी Live कुठे पाहाल? जाणून घ्या वेळ, ठिकाण अन् मोबाईलवर कुठे पाहता येणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com