Harsh Dubey Tanush Kotian Vipraj Nigam Shivang Kumar
esakal
Harsh Dubey Tanush Kotian Vipraj Nigam Shivang Kumar: भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर ( IND vs SL ) रवाना होणार आहे. ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत भारती विरुद्ध श्रीलंका स्थानिक एकादश यांच्यात तीन दिवसीय सराव सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर १५ ऑगस्टपासून पहिली कसोटी खेळवली जाईल आणि श्रीलंकेच्या खेळपट्टीवर दमदार कामगिरी करण्यासाठी भारतीय संघाने नामी शक्कल लढवली आहे. श्रीलंकेच्या संघात फिरकीपटूंचा भरणा आहे आणि यजमान असल्याने ते फिरकीला पोषक खेळपट्टी तयार करतील यात शंका नाही. अशात त्यांच्या फिरकीचा सामना करण्यासाठी BCCI ने आपले 'Fantastic Four' मैदानावर उतरवले आहेत.