INDW vs WIW: हरमनप्रीतच्या नेतृत्वाची कसोटी; नवी मुंबईत आजपासून भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका

India vs West Indies Women T20I: भारतीय महिला संघाची आजपासून वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० मालिका सुरू होत आहे. यात प्रामुख्याने कर्णधार हरमनप्रीत कौरची प्रतिष्ठा पणास लागणार आहे.
India vs West Indies Women
Harmanpreet Kaur | India Women CricketSakal
Updated on

India Women vs West Indies Women: काही दिवसांअगोदर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात व्हाईटवॉश स्वीकारावे लागलेल्या भारतीय महिला संघाची आजपासून (१५ डिसेंबर) वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० मालिका नवी मुंबईत सुरू होत आहे. यात प्रामुख्याने कर्णधार हरमनप्रीत कौरची प्रतिष्ठा पणास लागणार आहे.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अपयश येत आहे. महिला ट्वेन्टी-२० स्पर्धेत साखळीतच आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध यश मिळवलेले असले तरी ऑस्ट्रेलियात दारुण अपयशाचा सामना करावा लागला होता.

India vs West Indies Women
IND vs AUS: गॅबा कसोटी जर पावसामुळे ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC Final पर्यंत कशी पोहचणार? जाणून घ्या समीकरण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com