
Australia vs India 3rd Test at Gabba: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर शनिवारपासून (१४ डिसेंबर) होत आहे. मात्र, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसामुळे अडथळा आला.
पहिल्या दिवशी केवळ ८० चेंडूंचा म्हणजे १३.२ षटकांचा खेळ झाला. या सामन्यात यापुढच्या ४ दिवसांमध्येही बऱ्यापैकी पावसाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या चारही दिवसात पावसामुळे काही षटके वाया जाण्याची शक्यता आहे.