IND vs ENG Test : इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारताचा win-loss ratio एक झाला म्हणजे नेमकं काय झालं?

Team India Win - Loss Ratio In Test Cricket : इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटीतील विजयानंतर भारताची कसोटी क्रिकेटमधील विजय आणि पराजयाची आकडेवारी समसमान झाली.
IND vs ENG Test Win-Loss Ratio
IND vs ENG Test Win-Loss Ratioesakal

IND vs ENG Test Win-Loss Ratio : भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव करत मालिका 4-1 अशी जिंकली. या कसोटी विजयानंतर भारताची कसोटी क्रिकेटमधील विजय आणि पराजयाची आकडेवारी समसमान झाली. यालाच क्रिकेटिंग भाषेत भारताचे win-loss ratio हा 1 झाला असं म्हणतात.

भारताने धरमशालेत आपला 579 वा कसोटी सामना खेळला. यापूर्वी भारताच्या कसोटी कामगिरीच्या मुल्यमापनात विजयापेक्षा पराभवच जास्त होते. मात्र आता भारताने विजय आणि पराभव समसमान पातळीवर आणले आहेत. भारताने 178 कसोटी जिंकल्या असून तेवढच्या कसोटीत भारताला पराभव सहन करावा लागला आहे.

IND vs ENG Test Win-Loss Ratio
IND vs ENG : मी तुमचं दुःख समजू शकतो... भारताच्या 'ब' संघाकडून हरणाऱ्या इंग्लंडला कोणी काढला चिमटा?

भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 579 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये संघाला 178 विजय आणि तेवढेच पराभव मिळाले आहेत. संघाचे 222 सामने अनिर्णित राहिले आहेत. टक्केवारीच्या बाबतीत भारत हा जगात सर्वाधिक ड्रॉ सामने करणारा संघ आहे. पराभवाच्या बाबतीत भारताची टक्केवारी फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडपेक्षा वाईट आहे. विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत अनेक संघ भारतापेक्षा सरस आहेत. भारताने 30.74 टक्के कसोटी जिंकल्या आहेत, तर ऑस्ट्रेलिया 47.69 टक्के विजयांसह अव्वल स्थानावर आहे.

IND vs ENG Test Win-Loss Ratio
Rohit Sharma Retirement : ...तर मी थेट निवृत्ती घेईन! पाचव्या कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्माने दिली मोठी हिंट

2000 पासून भारताची दमदार कामगिरी

2000 पासून भारताने 249 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये संघाला 117 विजय आणि फक्त 69 पराभव पत्करावे लागले आहेत. 63 सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याआधी टीम इंडियाने 68 वर्षात 330 कसोटी सामने खेळले होते. त्यात केवळ 61 विजय मिळाले. संघाला 109 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. भारताला पहिली कसोटी जिंकण्यासाठी 25 सामने आणि 20 वर्षे वाट पाहावी लागली.

11 वर्षापासून मायदेशात हरले नाहीत मालिका


भारतीय संघाने 11 वर्षांपासून मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. 2013 पासून भारताने मायदेशात 51 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये संघाला 40 विजय आणि फक्त 4 पराभव मिळाले आहेत. 7 सामने अनिर्णित राहिले. गेल्या दोन दौऱ्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील शेवटची कसोटी मालिकाही अनिर्णित राहिली होती.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com