India Women Cricket: भारतीय महिला क्रिकेट संघाचे ऐतिहासिक यश; तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी मात टी-२० मालिकेत २-१ने बाजी

Smriti Mandhana: स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या दमदार फलंदाजीसह भारताच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय मिळविला. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा ऐतिहासिक विजय संपादन केला.
India Women Cricket

India Women Cricket

sakal

Updated on

ॲडलेड : भारताच्या महिला क्रिकेट संघाने शनिवारी ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक यश संपादन केले. स्मृती मानधना (८२ धावा), जेमिमा रॉड्रिग्ज (५९ धावा) यांची शानदार फलंदाजी आणि श्रेयांका पाटील (३/२२), श्री चरणी (३/३२) व अरुंधती रेड्डी (२/३५) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान ऑस्ट्रेलियन संघावर १७ धावांनी विजय मिळवत तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ असे घवघवीत यश संपादन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com