

IND vs SA
esakal
Major Change in India's South Africa Women Tour: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मोठा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला या दौऱ्यात एक कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार होते. मात्र आता या मालिकेत ३ टी-२० सामन्यांचीही भर घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.
हा निर्णय क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने पुढील वर्षी होणाऱ्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी लक्षात घेऊन घेतला आहे. मजबूत संघाविरुद्ध खेळल्याने मोठ्या स्पर्धेपूर्वी चांगली तयारी करता येईल, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.