
ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2025 India vs Scotland: भारतीय मुलींनी १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. तृषा गोंगाडीच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने २०८ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर आयुषी शुक्ला वैष्णवी शर्मा यांनी अचूक मारा करून स्कॉटलंडच्या संघाला ५८ धावांत तंबूत पाठवले. भारतीय मुलींनी १५० धावांनी हा सामना जिंकला.