
बुधवारी (९ जुलै) भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवला आहे. मँचेस्टरला झालेल्या चौथ्या टी२० सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या महिला संघाला ६ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.
यासोबत भारताच्या संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे भारताचा या मालिकेतील विजयही निश्चित झाला आहे. हा मालिका विजय भारतीय संघासाठी ऐतिहासिकही ठरला.