Rohit Sharma emotional reaction after India Women win World Cup
esakal
India Women vs South Africa Women Final Marathi Cricket News : भारतीय संघाने २००० मध्ये वर्ल्ड कप विजयाचे पाहिलेले स्वप्न २०२५ मध्ये सत्यात उतरले. २००५ व २०१७ मध्ये भारतीय महिला संघ अंतिम फेरीत पोहोचून रिकाम्या हाताने माघारी परतला होता. पण, यावेळी हरमनप्रीत कौरच्या संघाने उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा काटा काढून जेतेपद तिथेच पक्के केले होते. आता फक्त त्यांना दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जेतेपदाची औपचारिकता पूर्ण करायची होती. ती नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर केली... भारतीय संघाने ५२ धावांनी फायनल जिंकून पहिला वर्ल्ड कप जिंकला. यानंतर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माही ( Rohit Sharma Emotional ) भावुक झाला.