Indian batters in ICC T20I top 10 rankings
esakal
Indian batters dominate ICC ODI and T20I rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी आयसीसी वन डे व ट्वेंटी-२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व स्पष्टपणे दिसतेय, कारण दोन्ही फॉरमॅटमधील अव्वल दहा फलंदाजांमध्ये भारताचे प्रत्येकी चार खेळाडू जागा पक्की करून आहेत. भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) काल वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावून टॉप टेनमध्ये भरारी घेतली, तेच वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावणारा लोकेश राहुलही ( KL Rahul) अव्वल दहा फलंदाजांमध्ये आला आहे.