
अमेरिकेत सध्या आयसीसी वर्ल्ड कप लीग टू २०२३-२७ स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत शनिवारी युनायडेट स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) संघाने कॅनडविरुद्ध १६९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. युएसएच्या या विजयात दोन भारतीय वंशाच्या खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे राहिले. हा सामना फ्लोरिडामधील लौडरहिल येथे पार पडला.