
Rinku Singh Engagement: भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आला आहे. त्याचा उत्तरप्रदेशमधील खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा झाला आहे. समाजवादी पार्टीची सदस्य असलेली प्रिया सरोज दुसऱ्या क्रमांकाची सर्वात तरुण खासदारही आहे.
अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार त्याचा दोन-तीन दिवसांपूर्वीच साखरपूडा झाला आहे. आता लवकरच रिंकू आणि प्रिया हे लग्नबंधनात अडकणार आहेत.