Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Father's Day: शिखर धवनला पितृदिनाच्या शुभेच्छा देताना त्याच्या मुलाच्या दुराव्याचे दु:ख लपवता आलेलं नाही.
Shikhar Dhawan
Shikhar DhawanSakal

Shikhar Dhawan Post: रविवारी (16 जून) सर्वत्र पितृदिन साजरा करण्यात आला. दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार हा पितृदिन म्हणून साजरा केला जातो. याचनिमित्ताने अनेकांनी विविध स्वरुपात आपल्या वडिलांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे.

भारताचा सलामीवीर शिखर धवन यानेही पितृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे, पण या शुभेच्छा देताना त्याला त्याच्या मुलाच्या दुराव्याचे दु:ख लपवता आलेलं नाही.

खरंतर शिखरने गेल्या काही काळात वैयक्तिक आयुष्यात मोठे चढ-उतार पाहिले आहेत. त्याला आणि पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्पोटाच्या प्रकरणामुळे मुलाशी संपर्क करता येत नसल्याचे अनेकदा सांगितले आहे. आता पुन्हा एकदा त्याने त्याचा मुलगा झोरावरपासून दूर असल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

Shikhar Dhawan
Shikhar Dhawan Divorce : प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवनच्या वैवाहिक नात्याला 'सुरुंग'! घटस्फोट मंजूर, पत्नीकडूनच व्हायचा छळ

शिखरने रविवारी पितृदिनानिमित्त एक जूना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिखर त्याचे वडील आणि मुलाबरोबर बसलेला दिसत आहे.

त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये शिखरने लिहिले की 'माझ्या वडिलांना पितृदिनाच्या शुभेच्छा. प्रत्येक गोष्टीसाठी शुभेच्छा.'

'माझ्यासाठी हा भावुक पितृदिन आहे, कारण मी माझ्या मुलाशी बोलू शकलेलो नाही. माझा त्याच्याशी काहीही संपर्क झालेला नाहीये. त्यामुळे त्या सर्व वडिलांनाही पितृदिनाच्या शुभेच्छा, जे माझ्यासारख्या भावनांचा अनुभव घेत आहेत. त्यांना खूप प्रेम आणि सकारात्मकता मिळो.'

Shikhar Dhawan
Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

शिखर गेल्या बऱ्याच महिन्यांपासून त्याच्या मुलाला भेटलेला नाही. खरंतर तो आणि आयेशा 2021 मध्ये वेगळे झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यात घटस्फोटही झाल्याचे समोर आले. घटस्फोटानंतर झोरावर आयेशाबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये राहतो.

आयेशा ऑस्ट्रेलियन नागरिक असून तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. तिने शिखरबरोबर 2012 साली दुसरे लग्न केले होते. त्यानंतर 2014 मध्ये झोरावरचा जन्म झाला.

पण लग्नाच्या जवळपास 9-10 वर्षांनी शिखर आणि आयेशा एकमेकांपासून वेगळे झालेत. तेव्हापासून शिखर त्याच्या मुलाला भेटण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com