Yashasvi Jaiswal : स्वप्नांचा पाठलाग करा ; यशस्वी जयस्वाल

आपल्याला जीवनात नक्की काय व्हायचे आहे ते ठरवून त्या ध्येयपूर्तीसाठी मोठी स्वप्नं पाहा आणि ती स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी कठोर मेहनत करा, यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेईल, असे भारताचा नवोदित फलंदाज यशस्वी जयस्वाल याने युवा खेळाडूंना सांगितले.
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal sakal

मुंबई : आपल्याला जीवनात नक्की काय व्हायचे आहे ते ठरवून त्या ध्येयपूर्तीसाठी मोठी स्वप्नं पाहा आणि ती स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी कठोर मेहनत करा, यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेईल, असे भारताचा नवोदित फलंदाज यशस्वी जयस्वाल याने युवा खेळाडूंना सांगितले. निमित्त होते खार जिमखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या ७८व्या सेठ गोरधनदास करसनदास चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या चार कसोटीत ९३.५७च्या सरासरीने ६५५ धावा आणि त्यात सलग दोन कसोटीत द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करणाऱ्या यशस्वीने आपल्या या कामगिरीने मुंबईतील तमाम युवा पिढीला मोहिनी घातली. खार जिमखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी यशस्वी जयस्वाल याला प्रमुख पाहून म्हणून बोलाविण्यात आले.

युवा क्रिकेटपटूंनी त्याचे आगमन होताच ‘जयस्वाल... जयस्वाल...’ अशा घोषणा दिलेल्या पाहून तो भावुक झाला. एका छोट्याशा गावातून येऊनही जयस्वालने आपली यशोगाथा जगासमोर आणली अन् त्यामुळेच मोठी स्वप्नं पाहा, त्याचा पाठलाग करा आणि कठोर मेहनत घेतल्यास ती नक्की पूर्ण होतील, असे त्याने सांगितले.

Yashasvi Jaiswal
Pro Kabaddi Final Match 2024 : प्रो कबड्डीत पुणे प्रथमच चॅम्पियन ; अंतिम सामन्यात हरियानावर मात

मुंबई क्रिकेट संघटनेचे आणि वेळोवेळी सरावासाठी सुविधा पुरविणाऱ्या खार जिमखाना यांचेदेखील त्याने आभार मानले. यशस्वी जयस्वाल याच्या हस्ते या स्पर्धेचे विजेते यंग मुस्लिम स्पोर्टस् क्लब यांना विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. उपविजेते ठरलेल्या अवर्स क्रिकेट क्लब संघालादेखील जयस्वाल याच्या हस्ते गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com