
Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: गेल्या वर्षी भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविच यांच्या घटस्फोटाने सर्वांना धक्का दिला होता. चार वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
आता त्यानंतर अशी चर्चा आहे की भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे देखील घटस्फोट घेऊ शकतात. नजीकच्या काळात घडलेल्या घटनांमुळे याबाबत सध्या चर्चा जोर धरत आहे.