
Australia vs India Test Series: ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दोन दौऱ्यांमध्ये भारतीय संघाने यश मिळवले होते. त्यात चेतेश्वर पुजाराचा मोठा हात होता. तो खेळपट्टीवर तासंतास खंबीर उभा राहिला म्हणून ऑसी गोलंदाज थकून गेले.
दुसऱ्या बाजूने धावा जमा करणे आम्हाला शक्य झाले. आता त्याच्यासारखा संयमी फलंदाज संघात दिसते कुठे, असा महत्त्वाचा मुद्दा रवी शास्त्री यांनी मांडला.