

Mohammad Kaif on Pakistan Cricket Board: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ब गटातील सामन्यातील विजेता उपांत्य फेरी निश्चित करणार होता; परंतु अवेळी पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ब गटातील सर्व समीकरणे बिघडली.
पाऊस थांबलाच नसल्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली; परंतु पाऊस थांबला असता तरी मैदान ओलरस राहिले असते आणि खेळ सुरू होणे कठीणच होते, अशी शक्यता होती, कारण रावळपिंडी मैदान पुर्णत: झाकण्यात आले नव्हते. उर्वरित मैदान पावसात ओलसर झाले होते. आयसीसीची स्पर्धा असताना केवळ तुटपुंजे अच्छादन असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळावर टीका करण्यात येत आहे. आयसीसी या स्पर्धेच्या आयोजनासाठी मोठा निधी दिलेला आहे; पण पुरेशी आच्छादने का आणली नाहीत, अशी विचारणा केली जात आहे.