BCCI vs PCB Player Salaries: A Massive Pay Difference Explained
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) नुकतेच वार्षिक कराराची घोषणा केली. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांना A+ श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या या घोषणेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) पाकिस्तानी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पगाराची चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयने ३४ खेळाडूंना चार श्रेणीमध्ये विभागले आहे, तर पीसीबीने मागील वर्षी २५ खेळाडूंना चार श्रेणींमध्ये समाविष्ट केले होते. या दोन्ही देशांच्या खेळाडूंच्या करारांमधील कमाईतील फरक हा चर्चेचा विषय आहे.