
IPL 2025 New Format: Team Groupings, Match System & Playoff Rules: चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल ९ मार्चला खेळवली जाणार आणि बरोबर १२ दिवसांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वाला सुरुवात होणार आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यांसमोर उद्घाटनीय लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ( RCB vs KKR ) आव्हान असणार आहे. त्यानंतर रविवारी डबल हेडर सामने पाहायला मिळतील. दुपारच्या सत्रात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान आणि सायंकाळी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( CSK vs MI) या तगड्या सामन्यांची मेजवानी आहे. पण, १० संघांची दोन गटांत विभागणी केली गेली आहे आणि त्यांचे सामने कसे ठरतात हे आज जाणून घेऊयात...