Hardik Pandya is likely to be rested for the 4th T20I against New Zealand
esakal
India vs New Zealand 4th T20 match preview: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेली ही सलग नववी ट्वेंटी-२० मालिका आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला त्यांच्या तयारीची चाचपणी करण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये खेळणारे खेळाडूच प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसत आहेत. तिलक वर्माही वर्ल्ड कप खेळणार असल्याने भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. पण, टीम इंडिया आता उर्वरित दोन सामन्यांत आता टीम इंडियाला प्रयोग करण्याची संधी आहे.