
India have registered their highest ODI total today Men’s or Women’s
प्रतिका रावल आणि स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात आयर्लंडविरुद्ध ४३५ धावा कुटल्या. प्रतिकाने वन डेतील पहिले शतक झळकावताना १२९ चेंडूंत २० चौकार व १ षटकारांसह १५४ धावांची वादळी खेळी केली. स्मृतीनेही ८० चेंडूंत १२ चौकार व ७ षटकारांसह १३५ धावा चोपल्या. स्मृतीने ७० चेंडूंत तिहेरी धावसंख्या पूर्ण करून भारताकडून वन डेत वेगवान शतक झळकावणाऱ्या महिला खेळाडूचा मान पटकावला. या दोघींच्या शतकानंतर रिचा घोषनेही ५९ धावांचे योगदान दिले. भारतीय महिला संघाने आज अनेक विक्रम मोडले, परंतु त्यांनी रोहित शर्माच्या पुरुष संघाचाही मोठा पराक्रम आता स्वतःच्या नावावर केला.