Womens World Cup: भारतीय संघाची आजपासून खडतर परीक्षा; महिला विश्वकरंडक : आता आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडशी सामने
Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंका व पाकिस्तानला पराभूत करून विश्वकरंडकात शानदार सुरुवात केली. उद्या दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या साखळी फेरीत त्यांना खडतर आव्हानाची तयारी करावी लागणार आहे.
विशाखापट्टणम : पहिल्या दोन लढतींमध्ये श्रीलंका व पाकिस्तान संघाला नमवत महिला एकदिवसीय विश्वकरंडकाची सुरुवात शानदार करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला उद्यापासून खडतर परीक्षेचा सामना करावा लागणार आहे.