भारतीय महिला क्रिकेट संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. या विजयामुळे महिला क्रिकेटला भारतात नवी ओळख मिळाली. यामुळे भारतीय खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूतही मोठी वाढ झाली आहे..भारतीय महिला संघाने रविवारी वनडे वर्ल्ड कप जिंकून इतिहास जिंकला. वरिष्ठ स्तरावरील भारतीय महिला संघाचे हे पहिलेच आयसीसी विजेतेपद ठरले. यापूर्वी अनेकदा विजेतेपदाच्या जवळ येऊनही ट्रॉफी मात्र भारतीय महिला संघाला हातात घेता आली नव्हती. मात्र रविवारी अखेर अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली आणि मेहनत फळाला आली. भारतीय महिला संघाने नवी मुंबईत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत केलं आणि विजेतेपद नाववर केलं..World Cup उंचावणाऱ्या हातांना लागणार मेंहदी, स्मृती मानधनाच्या घरी आता लगीनघाई, कधी होणार विवाह?.या स्पर्धेने महिला क्रिकेटला एका नव्या उंचीवर पोहचवताना नवी ओळख मिळवून दिली. महिला क्रिकेटला भारतात नवी ओळख तर मिळाली, पण आता खेळाडूंकडेही अनेकांचे लक्ष लेधले गेले आहे. अनेक खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यूमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. रिपोर्ट्सनुसार भारतीय महिला क्रिकेटपटूंची जाहिरातींच्या फीमध्ये २५ ते १०० टक्के वाढ झाली आहे..इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार जेमिमा रोड्रिग्स, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा आणि बऱ्याच खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरील फॉलोवर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दुप्पट ते तिप्पट पटीने ही वाढ झालेली आहे. त्यामुळे जाहिरातींसाठीही खेळाडूंच्या एजन्सीकडे अनेक ऑफर्स येत आहेत. .बेसलाईन व्हेंचर्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर तुनी मिश्रा यांनी सांगितले की 'सकाळपासूनच वेगवेगळ्या ब्रँड्सकडून चौकशी केली जात आहे. फक्त नव्या जाहिरातींसाठीच नाही, तर आधीच्या करारांचाही पुनर्विचार केला जात आहे. काही करारांच्या मानधनात तब्बल २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ सुचवण्यात आली आहे.'.ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीक १२७ धावांची खेळी करणारी जेमिमा रोड्रिग्सच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये तर १०० टक्के वाढ दाखवत आहेत. तिला मॅनेज करणारी एजन्सी जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे मुख्य वाणिज्य अधिकारी करण यादव यांनी सांगितले की त्यांनाही बऱ्याच ऑफर आल्या आहेत. तिच्यासाठी १० ते १२ वेगवेगळ्या प्रकारातील ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी सध्या त्यांची चर्चा सुरू आहे.' .Women's World Cup Team: वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघात हरमनप्रीत कौरला स्थान नाही; भारताच्या तीन खेळाडूंची निवड, कॅप्टन कोण?.तसेच रिपोर्ट्सनुसार जेमिमा आता जाहिरातीसाठी ७५ लाख ते दीड कोटीपर्यंत फी घेईल. स्मृती मानधना आधीच अनेक जाहिरातींमध्ये दिसत आहे. आता यात आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत. ती साधारण प्रत्येक ब्रँडसाठी दीड ते दोन कोटी रुपये फी घेत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता अर्थिकदृष्ट्याही भारतीय महिला क्रिकेटपटूंना फायदा होत असल्याचे दिसत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.