
नवी दिल्ली : भारत व श्रीलंका येथे ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत महिलांच्या एकदिवसीय विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या तयारीला आता वेग आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघ उद्यापासून विखाशापट्टनम येथे कसून सराव करणार आहे. या सरावात निवड झालेल्या १५ खेळाडूंसह आणखी सहा खेळाडूंचाही समावेश असणार आहे.