India tour of Bangladesh 2026 latest news
esakal
India tour of Bangladesh 2026 latest news: मागच्या वर्षी बांगलादेशात सत्तापालट झाले.. त्या दरम्यान झालेल्या उद्रेकात हिंदूंवर प्रचंड अत्याचार करण्यात आला... त्या किंकाळ्या, त्या वेदना भारतीयांपर्यंत पोहोचल्या आणि सोशल मीडियावर बांगलादेशविरुद्ध क्रिकेट संबंध नको, अशी मागणी झाली... आयपीएलम फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) बांगलादेशी गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान याला करारमुक्त केले. वाढलेल्या तणावामुळे भारताचा बांगलादेश ( IND vs BAN) दौरा स्थगित केला गेला. त्यानंतर बांगलादेश संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात खेळण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. पण, झालं गेलं, गंगेला मिळालं... अशा भूमिकेत BCCI आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तशी बातमीच समोर आली आहे.