India's Squad For England Tour: रोहित शर्माची निवृत्ती अन् विराट कोहलीचा 'हट्ट'; BCCI ला काही सुचेना, कसा असेल कसोटी संघ?

India squad selection issues for England tour 2025 : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची निवड करताना बीसीसीआयची तारांबळ उडताना दिसतेय. एका बाजूला रोहित शर्माने निवृत्ती घेतली आहे, तर दुसरीकडे विराट कोहलीनेही न खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Rohit Sharma-Virat Kohli
Rohit Sharma-Virat Kohliesakal
Updated on

India Tour to England: भारतीय संघात स्थित्यंतर होत आहे. रोहित शर्माने ( Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवड समिती प्रमुख अजित आगरकरचे काम सोपे झाले असे वाटत होते. पण, त्यातच विराट कोहलीनेही ( Virat Kohli) कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा नसल्याचे व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांची पंचायत झाली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, अजित आगरकर व संघ व्यवस्थापन यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ या हंगामाची तयारी करायची आहे. तोपर्यंत रोहित ३९ व विराट ३८ वर्षांचे होतील आणि त्यासाठीच टीम इंडियात नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, आता कसोटी संघात कोणाला संधी द्यावी, हा पेच पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com