

India's Champions Trophy squad is set to be announced : चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा केली जाणार आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यात ही घोषणा होईल. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत पाकिस्तान आणि दुबई येथे ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी भारताचा १५ सदस्यीय संघ आज जाहीर केला जाईल.