India’s Test squad for West Indies series.
आशिया चषकानंतर भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका भारतात होणार आहे.
शुभमन गिल घरच्या मैदानावर प्रथमच कसोटी मालिकेत नेतृत्व करणार आहे.
जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
Shreyas Iyer comeback: Jasprit Bumrah rested for West Indies Test series : आशिया चषक २०२५ स्पर्धेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती. कर्णधार म्हणून गिलचा तो पहिलाच परदेश दौरा होता आणि आता घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत विजयासाठी गिल उत्सुक आहे. या मालिकेसाठीचा संघ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे.