Rohit Sharma and Ravindra Jadeja during India’s disappointing ODI series against New Zealand.
India vs New Zealand ODI series full analysis: भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने भारतात जिंकलेली ही पहिलीच वन डे मालिका आहे. २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारताकडे १८ वन डे सामनेच आहेत आणि त्यापैकी ३ सामने झाले. पण, या मालिकेतील पराभवामुळे भारताच्या वर्ल्ड कप तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. भारताने या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका जिंकली होती, तरीही त्यांना किवींविरुद्ध समाधानकारक कामगिरी करता आली नाही.