IND vs ENG 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदर OUT, रोहित शर्मावर सस्पेन्स कायम! तिसऱ्या वन डेत कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

India vs England 3rd ODI Playing XI prediction: भारत-इंग्लंड वन डे मालिका निर्णायक टप्प्यावर आली आहे. जो रूटच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने मालिकेत पुनरागमन करताना १-१ अशी बरोबरी साधली. आता तिसरा व निर्णायक सामना लॉर्ड्सवर रविवारी होणार आहे.
India vs England 3rd ODI Playing XI prediction

India vs England 3rd ODI Playing XI prediction

esakal

Updated on

India vs England 3rd ODI Playing XI: इंग्लंडने दुसरी वन डे जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यामुळे भारताला मालिका जिंकायची असल्यास रविवारी लॉर्ड्सवर विजय मिळवावा लागेल. या महत्त्वाच्या लढतीपूर्वी भारताला झटका बसला आहे आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्यात रोहित शर्माभवती चर्चा रंगल्या आहेत. ही त्याची शेवटची वन डे मॅच असू शकते, अशा बातम्या समोर आल्या आहेत. BCCI ने जरी या चर्चा फेटाळल्या असल्या, तर पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे, हे उद्याच्या लढतीनंतर स्पष्ट होईल. या परिस्थितीत भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, हे जाणून घेऊयात..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com