भारत-इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून
इंग्लंडची लॉर्ड्स कसोटी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी
भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने जसप्रीतच्या जागी पर्याय सुचवला आहे.
IND vs ENG 4th Test playing XI prediction by Ajinkya Rahane : भारत-इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवला जाणार आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या अंतिम ११ मध्ये बदल होण्याचे स्पष्ट चिन्ह आहेत. भारताला तिसऱ्या कसोटीत थोडक्यात पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे इंग्लंडने पुन्हा एकदा मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. आता चौथी कसोटी जिंकून भारताचा पुनरागमनाचा प्रयत्न असणार आहे, परंतु त्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये नेमके बदल करणे गरजेचे आहे. अशात भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे हा टीम इंडियाच्या मदतीला आला आहे.