IND vs NZ 2nd ODI : वॉशिंग्टन सुंदर OUT, २ खेळाडू IN! दुसऱ्या वन डेसाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

India predicted playing XI for 2nd ODI vs New Zealand: भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी भारतीय संघात बदल होण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या सामन्यानंतर संघाला मोठा धक्का बसला असून वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे दुसऱ्या वन डेत उपलब्ध नसेल. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये किमान दोन बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
India predicted playing XI for 2nd ODI vs New Zealand

India predicted playing XI for 2nd ODI vs New Zealand

esakal

Updated on

Washington Sundar ruled out India team changes : भारत-न्यूझीलंड मालिका आता कुठे सुरू झाली आहे आणि भारताचे दोन खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाले आहेत. सामन्यापूर्वी रिषभ पंतला ( Rishabh Pant) दुखापत झाली आणि त्याला माघार घ्यावी लागली. त्यात पहिल्या वन डेत भारताने वडोदरा येथे विजय मिळवला, परंतु वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला आणि तोही उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. वॉशिंग्टन हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघाचा सदस्य आहे आणि त्याला वन डे सामन्यांत खेळवून संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करू शकत नाही. अशात १४ जानेवारीला होणाऱ्या दुसऱ्या वन डेसाठी भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com