Rohit Sharma and Hardik Pandya are likely to miss out,
esakal
Rohit Sharma and Hardik Pandya out of Afghanistan ODIs: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ नंतर भारतीय संघ २०२७ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला लागणार आहे. त्यादिशेने पाऊल टाकताना भारतीय संघाला सर्वप्रथम अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने संघबांधणीसाठी, आता प्रत्येक वन डे मालिका महत्त्वाची आहे. पण, रोहित शर्मा हा वर्ल्ड कप खेळणार का? हा प्रश्न सध्या सर्वांना सतावतोय. Mumbai Indians च्या या फलंदाजाला दुखापतीचा सामना करावा लागला आहे.