Suryakumar Yadav hospitalised in Germany for hernia surgery
भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचा हॉस्पिटलमधील एका फोटोने लोकांची चिंता वाढवली आहे. आयपीएल २०२५ गाजवल्यानंतर सूर्यकुमार यादव मुंबई ट्वेंटी-२० लीगमध्येही चांगला खेळला होता. पण, अचानक तो जर्मनीत उपचारासाठी पोहोचला आणि त्याने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील फोटो पोस्ट केल्याने चाहत्यांना काहीच कळेनासे झाले आहे. खरं तर, सू्र्यकुमार जर्मनीतील म्युनिच येथे हर्नियावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी गेला होता आणि त्याने तेथील हॉस्पिटलमधील फोटो पोस्ट करून प्रकृतीचे अपडेट्स दिले आहेत.