Shubman Gill and Gujarat Titans’ impact on Indian Test selection : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ नंतर भारतीय खेळाडू पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल? चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळाली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नवीन सुरुवात करणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ या हंगामाची भारतीय संघाची सुरुवात इंग्लंड दौऱ्यावरूच होणार आहे. संघाचा नेता बदलला की संघातील माणसही त्याच्या मर्जीतलीच असतात, हे आजच्या निवडीवरुन पुन्हा दिसले.