India warm-up match reduced to three days in Sri Lanka
esakal
Why India's practice match was shortened in Sri Lanka: भारतीय संघ पुढील महिन्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका ( SL vs IND ) दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेच्या सरावासाठी भारतीय संघ आधीच श्रीलंकेत दाखल होईल. पण, भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये, म्हणून श्रीलंकेने रडीचा डाव खेळला आहे. BCCI ने नुकतीय या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ एक सराव सामना खेळणार आहे. श्रीलंका कसोटी मालिकेच्या तयारीसाठी हा सराव सामना महत्त्वाचा आहे. कोलंबो येथे हा चार दिवसीय सराव सामना होणार आहे, पंरतु या सामन्याचे दिवस कमी करण्यात आले आहेत.