India's fielding woes continued in the ICC Women's T20 World Cup 2026
esakal
India Women vs Bangladesh Women Marathi Cricket News: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय महिला संघाला एका पराभवाने धक्का बसला आहे. त्यामुळेच आता उर्वरित सर्व सामने जिंकून अन्य संघांच्या निकालाची त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. हरमनप्रीत कौरचा हा संघ गुरुवारी बांगलादेशचा सामना करायला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर उतरला. बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात प्रेमा रावत व अरुंद्धती रेड्डी यांच्याजागी राधा यादव व रेणुका सिंग ठाकूर यांचा समावेश केला गेला आहे.