Harmanpreet Kaur first player to captain 150 T20I matches
esakal
India Women vs Pakistan Women Asia Cup 2026 Marathi : भारतीय संघाची विजयी घोडदौड रोखण्याची पाकिस्तानच्या महिला संघाने तयारी केली असली तरी, हरमनप्रीत कौरच्या संघाला हरवणे शेजाऱ्यांना शक्य नाही. आशिया चषक स्पर्धेतील मागील चार सामन्यांत भारताच्या पोरींनी बाजी मारली आहे आणि तेच एकूण १७ पैकी १४ सामन्यांत पाकिस्तानला धुळ चारण्यात आपल्याला यश आले आहे. हरमनप्रीतने टॉसच्यावेळीस पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाकडे पाहिलेही नाही आणि हस्तांदोलनही करण्याचे टाळले.