India beat Pakistan in Asia Cup 2026
esakal
India vs Pakistan Women Asia Cup 2026 match result : भारतीय संघाने महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला आव्हान देण्याच्या परिस्थितीतच ठेवले नाही. श्री चरणी, प्रेमा रावत, दीप्ती शर्मा यांच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ ५५ धावांत तंबूत परतला. त्यामुळे फलंदाजांना विजयासाठी फार कष्ट घेण्याची गरजच पडली नाही. भारताने हा सामना ९ षटकांत जिंकून स्पर्धेत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आणि अ गटातून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत एन्ट्री घेतली.